अध्यक्षपदी आरती बांदोडकर यांची निवड
प्रतिनिधी /पणजी
भाजपच्या महिला मोर्चा राज्य कार्यकारिणी अध्यक्षपदी आरती बांदोडकर यांची निवड करण्यात आली. त्याशिवाय मोर्चाच्या स्थायी निमंत्रकपदी सुलक्षणा सावंत, आमदार जेनिफर मॉन्सेरात आणि दिव्या राणे यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
मोर्चाच्या अन्य पदाधिकाऱयांमध्ये उपाध्यक्षपदी – स्वाती माईणकर, नयनी शेटगावकर, चंदा नाईक-देसाई, डॉ. स्नेहा भागवत, निहारिका मांदेकर, हेमांगी गोलतकर, अनिता रायकर., महासचिव – रंजिता पै, अनिता कवळेकर., सचिव – भारती नाईक, निक्लॉ गामा, तन्वी सावंत, दया प्रभू-तेंडुलकर, दिव्या गावकर, गौरी वळवईकर आणि सीमा वेळीप यांची निवड करण्यात आली आहे.
त्याशिवाय सुनीता साळगावकर, सोनाली नागवेकर, सरिता बोरकर, डॉ. जास्मिन ब्रागांझा, रुपा भक्ता, हेमाश्री गाडेकर, मनिषा नाईक, शुभांगी वायंगणकर, संक्रिता देसाई, सुलेखा शेटय़े, लक्ष्मी हरवळकर, वैशाली नाईक, नर्मदा कुंडईकर, मोनिका साळगावकर, स्मिता प्रभू पर्रीकर, स्मिता कुडतरकर, दिया बांदोडकर, अंजली चोडणकर, खुशी वेळीप, स्नेहा कारेकर, समीरा कार्दोज, रेश्मा फडते, सुमित्रा नाईक, प्रतीक्षा मयेकर, हेझेल डिसिल्वा, वृषाली नागवेकर, तेजश्री पै, डॉ. रसिका गावकर, ऍड. स्वाती वेर्लेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.