ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आ. मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसबा विधानसभेची तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, आज रात्री उशिरा दोन्ही जागांसाठी भाजपचा उमेदवार जाहीर होणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी आज भाजप-शिंदे गट आणि इतर संघटनांसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले, कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी आहे. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाहीत. भाजपकडे इच्छुकांची यादी तयार आहे. त्यामधून दोघांची या जागांसाठी निवड होईल. आज रात्री उशिरा आम्ही भाजपचे उमेदवार जाहीर करू.
अधिक वाचा : कसब्याच्या जागेवरून आघाडीत बिघाडी
जाहीर होणाऱ्या उमेदवारांची अर्ज भरण्याची वेळ आम्ही ठरवली आहे. 6 फेब्रुवारीला हे दोन्ही अर्ज भरले जातील. सकाळी 11 वाजता कसबा विधानसभेसाठी अर्ज भरला जाईल. तर दुपारी 1 वाजता चिंचवडच्या उमेदवाराचा अर्ज दाखल केला जाणार आहे.