कार 7.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेणार
नवी दिल्ली : लक्झरी कार ब्रँड बीएमडब्लू इंडिया यांनी एक्स-3 लाइनअपमध्ये दोन नवी डिझेल मॉडेल्स सादर केली आहेत. यामध्ये एसयूव्ही सेगमेंटमधील या कारचे वैशिष्ट्या म्हणजे ही कार 7.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगाने धावणार असून या गाडीचा टॉप स्पीड ताशी 213 किमी इतका राहणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. भारतामध्ये एक्स ड्राईव्ह20डी एक्स लाइन याची किमत 67.50 लाख रुपये तर एक्स 3 एक्स ड्राईव्ह20डी एम स्पोर्ट याची किमत 69.90 लाख रुपये एक्स-शोरूम दिल्ली असणार आहे. दोन्ही मॉडेल कारचे उत्पादन कंपनीच्या तामिळनाडूमधील प्रकल्पामध्ये केले जात आहे. कंपनी बीएमडब्लू एक्स 3 सह 3 वर्षे किंवा 40 हजार किमी आणि 10 वर्षे किंवा 2 लाख किमीपर्यंतच्या योजनेच्या पर्यायासह सर्व्हिस पॅकेज देत आहे.