वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील 16 आणि 17 सप्टेंबर रोजी होणाऱया नॉर्वे विरुद्ध लढतीतून भारताचा दुहेरीतील अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णाने दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
या लढतीसाठी अखिल भारतीय टेनिस संघटनेतर्फे घोषित करण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये सुमित नागल, रामकुमार रामनाथन, पी. गुणेश्वरन, युकी भांब्री आणि मुकुंद शशिकुमार यांचा समावेश आहे. दरम्यान बोपण्णाला घुडघ्याला झालेली दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसून त्याला डॉक्टरांनी काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला असल्याने तो या स्पर्धेसाठी उपलब्ध राहू शकणार नाही. आता या लढतीसाठी कदाचित दुहेरीच्या सामन्याकरीता बोपण्णच्या जागी साकेत मिनेनीला संधी मिळू शकेल.