बेळगाव : उत्तर प्रेदश येथील लखनौ येथे खेलो इंडिया युनिर्व्हसिटी गेम्स अॅथलेटिक्स स्पर्धेत बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठ श्रीनाथ दळवीने 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेत चौधरी चरणसिंग विद्यापीठाच्या नितिनकुमारने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. लखनौ येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत अंतिम शर्यतीत चौधरी चरणसिंग विद्यापीठाच्या नितिनकुमारने प्रथम क्रमांकासह सुवर्ण, कलकत्ता विद्यापीठाच्या करुणायम महतो याने द्वितीय क्रमांकासह रौप्य तर बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या श्रीनाथ गणपत दळवीने तृतीय क्रमांकासह कांस्यपदक पटकाविले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Previous Articleबेळगावची ज्युडोपटू सहनाची आंतरविद्यापीठ संघात निवड
Next Article मणिपूरमध्ये अमित शाह अॅक्शन मोडमध्ये
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.