शहरात बुद्ध प्रतिमेची मिरवणूक
बेळगाव : भारतीय बौद्ध महासभा शाखा बेळगावतर्फे शुक्रवारी सदाशिवनगर येथील बुद्ध विहारमध्ये बुद्ध जयंती साजरी केली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी बुद्ध विहारमध्ये बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना देण्यात आली. सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून भगवान बुद्धाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदाशिवनगर, बेलदार छावणी, आंबेडकरनगर मार्गे मिरवणूक काढून येथील बुद्धविहारात सांगता झाली. आंबेडकर उद्यानात समता सैनिक दल, भारतीय बुद्ध महासभा यांच्यातर्फे बुद्ध प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून 6.30 वा. त्री सरण पंचशिल घेतल्यानंतर धम्मप्रवचन केले. याप्रसंगी बौद्ध धम्म बांधव व बहुजन समाजातील सर्व बांधव उपस्थित होते.