जाजपूर :
ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यात सोमवारी रात्री मोठी दुर्घटना घडली आहे. कोलकाताच्या दिशेने जात असलेली एक बस पूलावरून खाली कोसळली आहे. या दुर्घटनेत एका महिलेसमवेत 5 जणांचा मृत्यू झाला तर 40 जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग-16 वर बाराबती पूलावर ही दुर्घटना घडली आहे. जखमींना कटक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना 3 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.