तणावामुळे डोळय़ांची प्रकृती बिघडतेय, दृष्टी कमजोर होण्याचा धोका वाढला
अत्याधिक तणाव घेणे तुमच्या डोळय़ांच्या प्रकृतीसाठी नुकसानदायक आहे. तणाव तुमच्या डोळय़ांची दृष्टीक्षमता हिरावून घेऊ शकतो. तणावामुळे ग्लूकोमा (मोतिबिंदू), व्हिजन लॉससह डोळय़ांशी निगडित अनेक समस्यांचा धोका वाढत असल्याचे एका अध्ययनात आढळून आले आहे. सर्वाधिक जोखीम दृष्टी कमजोर होण्याची आहे.
एका संशोधनानुसार 2040 पर्यंत जगभरात ग्लूकोमाच्या रुग्णांची संख्या वाढून 11 कोटींच्या आसपास पोहोचणार आहे. सततच्या तणावामुळे ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीममध्ये असंतुलन आणि वस्कुलर डिरेग्युलेशनमुळे डोळे अन् मेंदूवर नकारात्मक प्रभाव पडतो.
इंट्राओक्युलर प्रेशरमध्ये वाढ, एंडोथेलियल डिसफंक्शन (फ्लॅमर सिंड्रोम) आणि सूज तणावाच्या काही परिणामांमुळे अधिक नुकसान होऊ शकते असे संशोधकांना आढळून आले आहे. तसेच ब्लड वेसल्स हे कोर्टिसोल नावाच्या हार्मोनने प्रभावित होऊ शकतात. जेव्हा आम्ही तणावात असतो तेव्हा डोळय़ांमधील फ्लूइडमध्ये तणाव वाढण्यासह दबाव वाढतो, यामुळे ब्लड वेसल्स कोरडे होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे डोळय़ांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
7-8 तासांची झोप
जर एखाद्या व्यक्तीच्या डोळय़ांवर उपचार सुरू असल्यास आणि यादरम्यान तो व्यक्ती अधिक तणाव घेत असल्यास त्याचे डोळे बरे होण्याचे मोठा वेळ लागतो. दरदिनी किमान 7-8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास तणाव वाढण्याची शक्यता असते. हा प्रकार डोळय़ांसाठी नुकसानदायक ठरू शकतो असे संशोधकांनी म्हटले आहे.
दिवसा झोपल्याने…
घोरणाऱया तसेच दिवसा झोपणाऱया व्यक्तींमध्ये ग्लूकोमाची जोखीम 11 टक्क्यांनी वाढते. अनिद्रा आणि कमी किंवा अधिक झोप घेणाऱयांमध्ये हा धोका 13 टक्क्यांपर्यंत वाढतो. स्वभा, शिकण्याची क्षमता किंवा स्मरणशक्तीवरही याचा प्रभाव पडत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.