फातोर्डा / वृत्तसंस्था
फिफा यू-17 महिला फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील ड गटातील सामन्यात कॅनडाने फ्रान्सला 1-1 असे बरोबरीत रोखले. ऍनाबेलने 67 व्या मिनिटाला कॅनडाला आघाडीवर नेले. पण, सहाच मिनिटात ल्यूसी कॅल्बाने फ्रान्सतर्फे बरोबरीचा गोल केला. याचवेळी नवी मुंबईत क गटातील लढतीत आशियाई जायंट्स चीनने मेक्सिकोला 2-1 अशा फरकाने पराभूत केले. रुईकीने 49 व्या मिनिटाला पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर करत पहिला गोल केला तर यू हिने 90 मिनिटाला ही आघाडी 2-0 अशी भक्कम केली. स्टॉपेज टाईममध्ये तिसऱया मिनिटाला मेक्सिकोतर्फे कॅथरिनने सामन्यातील आपला एकमेव गोल नोंदवला.