पर्यटन खात्याची माहिती, तयारी सुरू
प्रतिनिधी /पणजी
कोविड संकटामुळे गेली दोन वर्षे कार्निव्हल महोत्सवाची धूम व शिमगोत्सवातील ओस्सय।़।़ ओस्सय।़।़।़चा निनाद न झालेल्या या दोन्ही उत्सवाच्या तारखा आज पर्यटन खात्याने जाहीर केल्या आहेत. यंदा कार्निव्हल व शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असून, 18 फेब्रुवारीपासून कार्निव्हल तर 8 मार्चपासून शिमगोत्सव साजरा होणार आहे. या दोन्ही उत्सवासाठी पर्यटन खात्याने जय्यत तयारीला सुरवात केल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
पर्यटनभवनात आज सकाळी पर्यटन खाते, पर्यटन महामंडळ व स्टेक होल्डर्स यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पर्यटन खात्याचे संचालक निखील देसाई यांनी दिली.या बैठकीत कार्निव्हल व शिमगोत्सव साजरा करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. यावेळी काही व्यावसायिकांचीही मते घेण्यात आली. कार्निव्हल व शिमगोत्सव साजरा करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, यासाठी
कार्निव्हल महोत्सव आयोजित करणाऱ्या आयोजकांना मार्ग ठरविण्याचे आणि त्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून रितसर परवानगी घेण्याचे बंधन पर्यटन खात्याने घातले आहे. कार्निव्हल हा वेळेत सुरू करण्याबाबतही आयोजकांना योग्य सूचना केल्या जातील, असे संचालक देसाई यांनी सांगितले.
शिमगोत्सवासाठीही मिरवणूक मार्ग निवडण्याची मुभा राहणार असून, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे राहणार आहे. शिमगोत्सवासाठी रात्री दहापर्यंत संगीत व वाद्य वाजविण्याची अट घालण्यात येणार आहे. त्यानंतर संगीत बंद करणे आवश्यक शिमगोत्सवात चित्ररथांची मिरवणूक ही खास आकर्षण असते. परंतु वेळेची मर्यादा घालण्यात आल्याने आयोजकांना ही चित्ररथ मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेत संपवावी लागणार आहे, असे देसाई यांनी सांगितले.
कार्निव्हल आयोजनाच्या तारखा…
यंदाचा कार्निव्हल महोत्सवाला 18 फेब्रुवारी पणजी येथून सुरवात करण्यात येणार आहे. त्यानंतर 19 रोजी मडगाव, 20 रोजी वास्को तर 21 रोजी म्हापसा शहरात आयोजन करण्यात आले आहे.
शिमगोत्सव फोंड्यात होणार सुरू
शिमगोत्सव हा राज्यात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याने राज्यातील विविध भागात 17 ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले आहे. फोंडा शहरातून 8 मार्च रोजी शिमगोत्सवाला सुरवात होईल. त्यानंतर पणजी, मडगाव, म्हापसा, वास्को या प्रमुख शहरात शिमगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.