शाहुवाडी, प्रतिनिधी
Kolhapur Shahuwadi News : किल्ले विशाळगड येथे पुरात्त्व विभागाच्या आदेशाचे उल्लघंन करून मांस घेऊन जाताना शाहूवाडी पोलिसांनी इरफान ईब्राहिम मुजावर (वय 38) रा. विशाळगड ता.शाहूवाडी यांच्याकडून बाँयलर कोंबडीचे नऊ किलो चिकन सुमारे दोन हजार रूपयेचा माल हस्तगत करून त्याच्या गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की,काल दि 13 आँगस्ट रोजी सकाळी विशाळगडाच्या पायथाच्या ब्रिजच्या खालून खोकलाबाई मार्गे विशाळगडावर जाण्याच्या ब्रिजच्या पश्चिम बाजूस विशाळगड येथे पुरातत्व विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी पोलिस करत असताना पोलीसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून विशाळगडावर पायी चालत प्लॅस्टीकच्या फरीतून नऊ किलो बॉलयर कोंबडीचे मांस (चिकन) घेवून जात असताना इरफान मुजावर सापडला. पो.काँ.प्रेमनाथ चौगुले यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली.
याबाबत शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. पुरातत्व विभागाच्या वतीने ऐतिहासिक ठिकाणी पशुहत्यास बंदी घातल्याने या आदेशांचे उल्लंघन केल्याने मुजावर विरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंदझाला आहे.अधिक तपास पो.हे.काँ.बाजीराव सिंघण करित आहेत.