एनजीओवर एफसीआरएच्या उल्लंघनाचा आरोप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय गृह मंत्रालयाने लेखक तसेच कथित मानवाधिकार कार्यकर्ते हर्ष मंदर यांची स्वयंसेवी संस्था ‘अमन बिरादरी’च्या विरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या एनजीओवर एफसीआरएच्या उल्लंघनाचा आरोप आहे. या चौकशीसंबंधी अधिकाऱयांनी सोमवारी माहिती दिली आहे.
अमन बिरादरी या एनजीओच्या विरोधात एफसीआरएच्या विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस करण्यात आली आहे. हर्ष मंदर मागील संपुआ सरकारच्या काळात सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य होते. एक धर्मनिरपेक्ष, शांतिपूर्ण, न्यायपूर्ण जगासाठी एक लोक अभियान म्हणून अमन बिरादरीची स्थापना केली होती.
विदेशातून देणगी मिळविण्यासाठी सर्व एनजीओंना अनिवार्य स्वरुपात एफसीआरए अंतर्गत गृह मंत्रालयाची अनुमती मिळवावी लागते. तर हर्ष मंदर यांच्या एनजीओला एफसीआरए अंतर्गत मंजुरी मिळाली नव्हती. तरीही या एनजीओने विदेशातून देणगी मिळविली आहे. एफसीआरए मंजुरीशिवाय विदेशातून निधी मिळविल्याप्रकरणी आता या एनजीओची चौकशी होणार आहे.