बेळगाव : नेत्रचिकित्सा क्षेत्रात 42 वर्षे अविरत सेवा देणाऱया नंदादीप आय हॉस्पिटलचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत डॉ. एम. डी. दीक्षित उपस्थित होते. त्यांच्यासह डॉ. माधुरी दीक्षित, डॉ. सदानंद पाटणे, डॉ. राजश्री अनगोळ, पोलीस उपायुक्त स्नेहा पी.व्ही., प्रांताधिकारी रवि करलिंगण्णावर, डीएचओ डॉ. शशिकांत मुन्याळ, डिस्ट्रिक्ट सर्जन डॉ. सुधाकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यतनट्टी, डॉ. रवी पाटील उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. दीक्षित यांनी डॉ. दिलीप पटवर्धन यांच्याशी असलेल्या नात्याला उजाळा दिला. डॉ. सौरभ पटवर्धन यांनी नंदादीपमधील सुविधांची माहिती दिली. मोतीबिंदू, काचबिंदू, रेटीना, तिरळेपणा, कोरडेपणा, चष्मा घालविणे या सुविधा येथे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. दिलीप पटवर्धन, डॉ. माधवी पटवर्धन, संचालक डॉ. सौरभ व डॉ. निधी पटवर्धन यांनी स्वागत केले. याप्रसंगी बेळगाव शाखेच्या प्रमुख डॉ. ज्योत्स्ना पाटील, डॉ. सज्जन संगई, डॉ. स्नेहा शिंदे, डॉ. सायन मुखर्जी, व्यवस्थापक विठ्ठल चव्हाण उपस्थित
Previous Articleमानाची सासनकाठी जोतिबा डोंगरावर दाखल
Next Article आयसीएलच्या कार्यालयाचे आज उद्घाटन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.