घरगुती उत्पादने, वैयक्तिक पॅकेजीस पोहोचविण्यासाठी कंपनी कार्यरत
प्रतिनिधी / बेळगाव
देशात आणि परदेशातील ग्राहकांना पार्सल पोहोचण्याच्यादृष्टिने इंटिग्रेटेड कुरिअर्स ऍण्ड लॉजिस्टिक (आयसीएल) ने बेळगावमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. बुधवार दि. 13 एप्रिल रोजी टिळकवाडी, सराफ कॉलनी येथील क्लासिक कॉम्प्लेक्स येथे कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कंपनीचे सीईओ सी. व्ही. रामण्णा यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, घरगुती उत्पादने, वैयक्तिक पॅकेजीस पोहोचविण्यासाठी आयसीएल कार्यरत आहे. इतकेच नव्हे तर एक्स्प्रेस डोअर डिलिव्हरी, एअर ऍण्ड ओशन प्रंट फॉर्वर्डींग आणि डी. जी. गुड्स यांचीही सेवा कंपनी देईल. विशेष म्हणजे यापुढे बेळगावचे वैशिष्टय़ असणारा कुंदासुद्धा चार दिवसांत अमेरिकेत पोहोचणार आहे, असे त्यांनी नमूद केले. कुंदय़ासह घरगुती उत्पादने, भारतीय पारंपरिक वस्तू, औषधे, इतर उत्पादने म्हणजेच संगीत वाद्ये किंवा भांडी आपली कंपनी 200 हून अधिक देशांमध्ये घरपोच पोहोचविते. पाश्चिमात्य देशांनी निर्बंध घातलेल्या वस्तू, रोख रक्कम आणि मौल्यवान धातू वगळता सर्व उत्पादने कंपनी कुरिअर करू शकणार आहे. कुंदा आणि अन्य पदार्थ पोहोचविण्यासाठी कंपनीने कॅम्प पुरोहितबरोबर भागीदारी केली आहे, असे त्यांनी सांगितले.
कंपनीचे 400 हून अधिक कर्मचारी असून 42 कार्यालये आहेत. कंपनीची वार्षिक उलाढाल 350 कोटींहून अधिक असून देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक्स्प्रेस डोअर टू डोअर डिलिव्हरीसाठी मान्यता मिळविली असल्याची माहिती त्यांनी दिली.
आयसीएलने आयएक्सजीसह भागीदारी केली असून त्याची माहिती देताना आयएक्सजीचे विद्याधर पाटील म्हणाले, आज बेळगावसह भारतातील अनेक कुटुंबातील मुले परदेशात आहेत. ते भारतात नसले तरी त्यांच्या मनात भारतीयत्व
आहे. त्यांना गावातील खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू आता सहजगत्या व वेळेत पाठविणे शक्मय होणार आहे.
आता कुंदा परदेशात पोहोचणार
राजपुरोहित यांनी कुंदा हा बेळगावचा ब्रॅन्ड आहे. आजवर परदेशात तो स्वीकारला जात नव्हता. विमानतळावर कुंदय़ाला हरकत घेतली जात असे. मात्र आता कुंदा परदेशात पोहोचणार असून आमच्यासाठी हा ऐतिहासिक असा आनंददायी क्षण असल्याचे सांगितले. प्रारंभी नागतिलक गणिकोप्प यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. याप्रसंगी मुंबईचे वैभव वाळवेकर उपस्थित होते.