सावंतवाडी / प्रतिनिधी
Central government protests from Sawantwadi Congress!
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने मानहानी प्रकरणात दोषी ठरवल्या प्रकरणी व विधान भवन समोर त्यांच्या प्रतिमेवर भाजप आमदारांकडून जोडो मारो आंदोलनाच्या निषेधार्य आज सावंतवाडी काँग्रेसकडून येथील गांधी चौकात आंदोलन छेडण्यात आले. तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन छेडण्यात आले यावेळी केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर,कॉग्रेस नेते दिलीप नार्वेकर, संजय लाड, सुधीर मल्हार,रविंद्र म्हापसेकर,अमिदी मिस्त्री, स्मिता वागळे, उल्का सांगेलकर, माया चिटणीस,विभावरी सुकी, आनंद परुळेकर ,अभय मालवणकर संतोष तावडे,बाबल गावकर पॉली डिसोजा ,तौकीर शेख, चंद्रकांत राणे, अशोक राऊळ, आनंद कुंभार,समीर भाट, राज पेडणेकर,आदी उपस्थित होते.