वृत्तसंस्था/ मेलबर्न
फिफाची महिलांची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा 20 जुलैपासून ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी भूषविले आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात 20 जुलैला होणार आहे. या सामन्याला शौकिनांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने या सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रेक्षकांची अधिक क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे.
20 जुलैपासून सदर स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात खेळवला जाईल. त्यानंतर 20 जुलैला दुसरा सामना न्यूझीलंड आणि नॉर्वे यांच्यात ऑकलंडच्या इंडन पार्क मैदानावर होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यातील सलामीचा सामना सिडनीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ऍलिनाझ स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार होता. या स्टेडियमची क्षमता 42,500 प्रेक्षकांची आहे पण फुटबॉल शौकिनांकडून या स्पर्धेला आतापासूनच अधिक प्रतिसाद मिळत असल्याने स्पर्धा आयोजकांनी या सामन्याच्sा ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा सामना सिडनीतील दुसऱया एका स्टेडियमवर होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे हे माजी ऑलिम्पिक स्टेडियम म्हणून ओळखले जाते. या स्टेडियमची क्षमता 82,000 प्रेक्षकांची आहे.
फिफाची 2023 सालातील महिलांची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी केली जाईल, असा विश्वास स्पर्धा आयोजकांनी तसेच फिफाने व्यक्त केला आहे. या स्पर्धेतील सामन्यांना किमान 1 लाख प्रेक्षकांची उपस्थिती राहिल. या दृष्टीकोनातून स्टेडियमची क्षमता वाढविण्यात आली आहे. 2021 साली ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका महिला फुटबॉल संघामध्ये आयोजिलेल्या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्याला विक्रमी 36,109 प्रेक्षकांची उपस्थिती होती. या आगामी स्पर्धेतील काही सामन्यांची तिकीटे शौकिनांनी यापूर्वीच आरक्षित केली आहेत.