मोरजी/प्रतिनिधी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पार्से येथे आयोजित केलेल्या श्री सातेरी देविच्या मूर्ती प्रतिस्थापन सोहळय़ाला उपस्थिती लावून श्री देवी भगवती आणि श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले.यावेळी त्यांच्या सोबत माजी मुख्यमंत्री प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर ,श्री भगवती देवस्थानचे पदाधिकारी श्री आनंद देसाई ,तसेंच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले,पार्से गावातील श्री देवी भगवती आपली कुलदेवता आहे.त्यामुळे तिच्या प्रत्येक उत्सवाला आम्ही कुटुंबीयासोबत उपस्थिती लावून आशीर्वाद घेतो.आज या देवस्थानात संलग्नीत असलेल्या श्री सातेरी देवीची नूतन मूर्ती प्रति÷पणा सोहळया निमित्त देवीचे खास दर्शन घेण्यासाठी मी आलेलो आहे.अश्या प्रकारचे उत्सव लोकांना एकत्रित आणतात देवीचे आशीर्वाद आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात.भाविका बरोबर अश्या उत्सवात सहभागी होतांना मला खूप आनंद होत आहे. यावेळी त्यांनी गोमंतकीय जनतेला अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या.