हैदराबाद / वृत्तसंस्था
विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीदरम्यान शनिवारी झालेल्या हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात (सेंट्रल युनिव्हर्सिटी) एबीव्हीपी आणि एसएफआयचे विद्यार्थी एकमेकांशी भिडले. या हाणामारीत अनेक विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी पोस्टर लावण्यावरून हाणामारी झाली. एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप अभाविपने केला आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर हैदराबाद विद्यापीठात यंदा विद्यार्थी संघ 2022-23 साठी मतदान झाले. या निवडणुकीत सुमारे 5,300 विद्यार्थ्यांनी मतदान केले.