वार्ताहर /जुने गोवे
पांडववाडा चोडण येथील साई लईराई क्रीडा आणि सांस्कृतिक संस्थेच्या सदस्यांनी हेल्पींग हेंडस ग्रुप ऑफ चोडण संस्थेच्या सहकार्याने कातलान ते खडप वाडय़ावर जाणाऱया रस्त्याची साफसफाई करून एक नवा आदर्श घालून दिला.
कातलान ते खडपवाडा रस्ता चांगला असतानाही रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेली, झाडेझुडपे वाढल्याने एक पायवाट असल्या सारखा वाटत होता. हे पाहून साई लईराई संस्थेचे अध्यक्ष संतोष कांदोळकर आणि सचिव योगानंद कोळकणकर यांनी इतर सदस्यांना घेऊन रस्त्यावर दोन्ही बाजूला वाढलेल्या वेली, झाडेझुडपे कापून रस्ता साफ केला.
संस्थेचे सदस्य अनंत मांदेकर, किसन उसकईकर, प्रजय नावेलकर, अभिजित उसकईकर, सायेश मांदेकर, औदूंबर उसकईकर, अभिषेक मराठे, अभिजित नाईक, कृष्णा पार्सेकर, सिल्वानो परेरा, युवराज कोल्हापूरकर, रुनाल कोळकणकर तसेच स्थानिक ज्ये÷ नागरिक शामसुंदर खांडेपारकर व शैलेश खांडेपारकर या सर्वांनी रस्त्याच्या साफसफाई कामांत भाग घेतला. हेल्पींग हेंडस ग्रुप ऑफ चोडण’चे कार्यकारी सदस्य विद्यानंद खांडेपारकर यांनी नैतिक सहाय्य केले.