लवीव शहरात 5 क्षेपणास्त्रs डागली ः 6 जणांचा मृत्यू
रशिया-युक्रेन युद्धाला 50 हून अधिक दिवस झाले असून रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमधील शहरांवरील हल्ले वाढविले आहेत. लवीव शहरात रशियाने 5 शक्तिशाली आणि घातक क्षेपणास्त्रs डागली असून यात कमीतकमी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर रशिया पूर्व डोनबास भागाला पूर्णपणे उद्ध्वस्त करू इच्छित असल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी केला आहे.
खारकीव्ह शहरात गोळीबारात 5 जण मारले गेल्याची आणि 13 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मायकोलाइव्हमध्ये ओडेसा बंदरानजीक सातत्याने रॉकेट हल्ले केले आहेत. युक्रेनने एका क्वेश्चयन एकर भरून देत युरोपीय महासंघात सामील होण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर पुतीन यांच्याकडून अण्वस्त्रांचा वापर केला जाण्याची शक्यता नसल्याचे युक्रेन सैन्याच्या गुप्तचर प्रमुखाने म्हटले आहे.
रशियाच्या हल्ल्याच्या सुमारे दीड महिन्यांनी युक्रेनच्या शहरांमधील स्थिती बदलू लागली आहे. युक्रेनचे नागरिक आता मायदेशी परतत आहेत. युएन ऑफिस फॉर द कॉर्डिनेशन ऑफ ह्युमॅनिटेरियन अफेयर्सनुसार दररोज 30 हजारांहून अधिक लोक युक्रेनमध्ये परतत आहेत. हे शरणार्थी आतापर्यंत पश्चिम युक्रेन आणि शेजारी देशांमध्ये राहत होते. युक्रेनच्या प्रौढ पुरुषांवर देश सोडण्यास बंदी होती यामुळे मायदेशी परतणाऱयांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण अधिक आहे. परंतु रशियाचे सैन्य सध्या प्रामुख्याने कीव्ह आणि नजीकच्या परिसरातून परतले आहे. याचमुळे नागरिक मुख्यत्वे कीव्हमध्ये परतत आहेत.
रशियाचे सैनिक मारियुपोल शहरात राहणाऱया लोकांच्या हालचालींवर बंधने लादत असल्याचा आरोप मारियुपोल महापौरांचे सल्लागार पेट्रो एंड्रीशचेंको यांनी केला आहे. नागरिकांना पास मिळविण्यासाठी रांगेत उभे रहावे लागते, या पासशिवाय शहरातील जिल्हय़ांदरम्यान ये-जा करण्यास मज्जाव करण्यात येत आहे, तसेच रस्त्यांवर फिरण्यापासूनही रोखले जात असल्याचे ते म्हणाले.
मॅक्रॉन यांनी युक्रेनचा दौरा करावा
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युक्रेनचा दौरा करावा. या दौऱयानंतरच मॅक्रॉन यांना रशियाच्या सैन्याने केलेला नरसंहार समजून येईल असे उद्गार युप्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी काढले आहेत. मॅक्रॉन यांनी काही दिवसांपूर्वी रशियाच्या हल्ल्याला नरसंहार ठरविण्यास नकार दिला होता.