अमरावती : प्रतिनिधी
यांच्या अटकेच मागणी लावून धरली आहे. दरम्यान, यशोमती ठाकूर यांना समाजमाध्यमावरून एका व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन दिवसापुर्वी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यभरात त्यांच्या विरोधात रोष वाढला आहे.
यशोमती ठाकूर यांना धमकी देताना धमकावणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे कि, “संभाजी भिडे यांच्या विरोधात जास्त बोललात, तर तुमचा दाभोळकर करू.” असा इशारा संबंधित व्यक्तीने दिला आहे.
दरम्यान या धमकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार यशोमती ठाकूर यांनी, “आपल्याला ज्या प्रकारची धमकी देण्यात आली आहे, त्याची जबाबदारी गृह विभाग, पोलीस यंत्रणा यांनी घेतली पाहीजे. माझ्या जिवाचे जर काही बरेवाईट झाले तर त्याला प्रतिष्ठानचे धारकरी, भाजप, पोलीस विभाग तसेच भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे हेच जबाबदार असतील.” असे म्हटले आहे.
संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कॉंग्रेसने राज्यभरात तीव्र निदर्शने करून संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.