घरोघरी मतदारांची भेट घेऊन केली मतयाचना : फेरीत अनेकांचा सहभाग
वार्ताहर /उचगाव
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी उचगाव येथे मंगळवार दि. 30 एप्रिल रोजी रात्री भव्य प्रचार फेरी काढून गावातील घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊन लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनाच मत टाकण्यासंदर्भात यावेळी प्रचार करण्यात आला. प्रारंभी उचगावच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या प्रचार फेरीला प्रारंभ करण्यात आला. यानंतर गणपत गल्ली, पावशे गल्ली, कचेरी गल्ली, लक्ष्मी गल्ली, रवळनाथ गल्ली, माऊती गल्ली, अनगोळ गल्ली, सुरवीर गल्ली, नागेश नगर, कोवाड रोड अशा सर्व भागात मतदारांची भेट घेऊन यावेळी मतदान करण्याचे सर्वांना आवाहन करण्यात आले. यावेळी उचगाव ग्रामपंचायतचे अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, ग्रा. पं.माजी अध्यक्ष संभाजी कदम, माजी सदस्य रामा कदम, शशिकांत जाधव, यादो कांबळे, मनोहर कदम, मुराद ताशीलदार, एल. डी. चौगुले, भारती जाधव, योगिता देसाई, रूपा गोंधळी, नागरत्न कोरडे, स्मिता खांडेकर, गजानन नाईक, पुन्नाजिचे यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उचगाव गावातील तमाम जनतेने मृणाल हेब्बाळकर यांनाच लोकसभेत पाठविण्याचा व निवडून आणण्याचा चंग बांधल्याचे व बोलून दाखवल्याचे दिसून येत होते.