प्रतिनिधी/ फोंडा
विभाजनकारी भाजपासारख्या भ्रष्ट जनता पार्टीला लोकसभा निवडणूकीत अद्दल घडविण्यासाठी विविधतेत एकता जपणाऱ्या कॉग्रेस पक्षाला निवडून द्या. फोंडयातील नगरपालीका निवडणूकीत कॉग्रेस पक्ष राजेश वेरेकर यांच्या नेतृत्वाखाली पुर्ण ताकदीनिशी सर्व 15 प्रभागात उमेदवार नेमणार आहे. पालीकेवर कॉग्रेसराज हीच लोकसभा निवडणूकीच्या तयारीसाठी नांदी ठरेल असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा कॉग्रेसचे युवा नेते युरी आलेमाव यांनी केले
फोंडा गट कॉग्रेस कमिटीतर्फे ‘हाथ से हाथ जोडो’ कार्यक्रमात काल शनिवारी राजेश वेरेकर यांच्या कार्यालयासमोर झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी कॉग्रेसचे गोवा प्रभारी मधुराई तामिळनाडूचे लोकसभा खासदार मनीकम टागोर, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन, हळदोणेचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा, कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, फोंड्याचे नेते राजेश वेरेकर, केंद्रीय समितीचे एम पे शेख, जॉन परेरा, फोंडा गट कॉग्रेस समितीचे अध्यक्ष विलीयम आगियार, सोशल मिडीया समन्वयक अमरनाथ पणजीकर व फोंडा तालुक्यातील विविध पंचायतींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘भारत जोडो’ नंतर ‘हाथ से हाथ जोडो’मुळे कॉग्रेसला बळकटी
कॉग्रेस नेते राहूल गांधी भारत जोडो यात्रेत यशस्वी झाल्यानंतर कॉग्रेसनी मतदारांपर्यत पोचण्यासाठी ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान हाती घेतलेले आहे. हे अभियान बारा मतदासरसंघात पुर्ण झाले असून येत्या दोन महिन्यात संपुर्ण गोवाभर राबविण्यात येणार आहे. कॉग्रेस नेते ब्लॉक आणि बुथ पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणार असल्याची माहिती कॉग्रेचे प्रभारी खासदार टागोर यांनी दिली.
स्वागतपर भाषणात राजेश वेरेकर म्हणाले की भाजपा सरकार सर्व आघाडयावर अयशस्वी ठरल्याचे सांगितले. मलनिस्सारण प्रकल्पाच्या खोदकामामुळे फोंड्यातील रस्ते खं•sमय, उपजिल्हा इस्पितळात वैद्यकीय सेवा रूग्णांपर्यंत पोचविण्यात आलेले अपयश, म्हादई बचावासाठी मवाळ धोरण व व्देषांचे राजकारण करण्यात पटाईत भाजपा सरकारला पराभूत करण्यासाठी कॉग्रेसला पालीका निवडणूकीत संधी द्या असे आवाहन वेरेकर यांनी मतदारांना केले.
कॅबिनेट मंत्री 33 टक्के फोंड्याचे तरीही वैद्यकीय सुविधांचा अभाव
यावेळी बोलताना अमित पाटकर म्हणाले विधानसभेचे 33 टक्के कॅबिनेट मंत्रीपदे फक्त फोंडा तालुक्याला प्राप्त झालेली आहे. तरीही फोंड्यातील आरोग्य सुविधाने मागासलेला आहे. फोंडा उपजिल्हा इस्पितळात सीटी स्कॅनची सोय नसल्याने गोमेकॉची वाट धरावी लागते हेच खरे फेंडावासियांचे दुर्दैव असल्याचे पाटकर म्हणाले. आमदार अॅड कार्लुस फेरेरा यांनी फोंडयाविषयी बोलताना फर्मागुडी येथील जीव्हीएम उच्च माध्यमिकच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनीही विचार मांडले.
प्रास्ताविक सुभाष फळदेसाई यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जॉन परेरा यांनी केले. विलीयम आगियार यांनी आभार मानले.