वृत्तसंस्था / अगरतळा
त्रिपुराचे शिक्षणमंत्री रतन लाल नाथ यांनी माजी मुख्यमंत्री विप्लव देव यांची तुलना स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि आईनस्टाईन यांच्याशी केली आहे. यामुळे रतन लाल नाथ हे वादात सापडले आहेत. आम्हाला स्वप्ने पाहण्याची शिकवण देणारे विप्लव देव हे एकमात्र व्यक्ती आहेत. त्यांनी स्वप्ने दाखविण्यासह ती पूर्णही केली आहेत. या जगात स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, आईनस्टाइन यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वांचा जन्म झाला. प्रत्येक ठिकाणी कुठल्या न कुठल्या थोर व्यक्तीचा जन्म होतच असतो. आमच्या राज्यात विप्लव देव यांनी जन्म घेतल्याने आम्ही भाग्यशाली आहोत असे उद्गार नाथ यांनी काढले आहेत.
देशाचे राजकारण, संस्कृती आणि परंपरेच्या विषयात अल्प ज्ञान असलेले लोक राज्य चालवत आहेत. विप्लव देव यांची तुलना महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांच्याशी करत या थोर व्यक्तींचा अपमान शिक्षणमंत्र्यांनी केला असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुबाल भौमिक यांनी केला आहे.