जपानमधील व्यक्तीने पूर्ण केली स्वतःची इच्छा
स्वतःच्या अजब कृत्यांमुळे अनेक लोक चर्चेत राहत असतात. अशाच प्रकारचे एक अजब प्रकरण जपानमधून समोर आले आहे. तेथे एका व्यक्तीच्या श्वान होण्याच्या छंदामुळे सर्वजण अवाप् झाले आहेत. जपानमधील या व्यक्तीचे नाव टोको असून त्याने आता श्वानाचे सोंग धारण केले आहे. माणसापासून श्वान झालेल्या टोकोने सोशल मीडियावर छायाचित्रेही शेअर केले आहेत. या छायाचित्रांची मोठी चर्चा होत आहे.
श्वानांसारखे जगण्याचे स्वप्न टोकोने बालपणापासून पाहिले होते. जपानची एक प्रोफेशनल एजेन्सी झेप्पेटने टोकोला एका कुली नावाच्या श्वानाच्या प्रजातीत बदलले आहे. या व्यक्तीला श्वान होण्याचा ध्यास इतका लागला की त्याने 11 लाख रुपये खर्च केले आहेत. 11 लाख रुपयांद्वारे त्याने एक असा कॉस्टय़ूम तयार करविला, जो परिधान करून तो हुबेहुब श्वानासारखा दिसतो. या कॉस्टय़ूमध्ये त्याला ओळखणे देखील अवघड आहे.
हा कॉस्टय़ूम तयार करण्यास सुमारे 40 दिवस लागले आहेत. हा कॉस्टय़ूम तयार करण्यास मोठी मेहनत करावी लागली, कारण माणूस आणि श्वानांमध्ये मोठा फरक असतो असे कंपनीने म्हटले आहे. हा कॉस्टय़ूम परिधान केल्यावर आपण पूर्णपणे श्वान वाटावे अशी टोको यांची इच्छा होती. टोकोला कूली या प्रजातीच्या श्वानाचीच निवड का केली अशी विचारणा करण्यात आली होती. याच्या उत्तरादाखल टोकोने कूली माझा सर्वात पसंतीचा श्वान असून तो सर्वात गोड असल्याचे म्हटले आहे. मोठे कान असलेला हा श्वान मानवी आकारात लपू शकतो, याचमुळे त्याची निवड केली. याचा कॉस्टय़ूम देखली अत्यंत जुळून येणारा दिसत होता असे त्याचे म्हणणे आहे.