भोपाळ
मध्यप्रदेशात सध्या मान्सूनच्या पावसाचा जोर आहे. बहुतेक सर्व नद्यांना पूर आला आहे. या राज्यातील रघुनाथपूर येथे नदीत एक बालक वाहून गेले. ते सापडत नाही म्हणून शोध सुरु झाला. गावकऱयांनी नदीतील एका मगरीला पकडले. या मगरीनेच बालकाला गिळले आहे, अशी गावकऱयांची समजूत झाली होती. त्यामुळे मगरीने बालकाला पोटातून बाहेर काढावे यासाठी गावकऱयांची धडपड सुरु होती. तथापि, काही वेळानंतर आपत्कालीन साहाय्यता पथकाने वाहून गेलेले आणि मृत झालेले बालक शोधून काढले. त्यामुळे गावकऱयांचा मगरीवरचा संशय मिटला आणि नंतर मगरीची सुखरुप सुटका करण्यात आली. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या प्रसारित होत असून तो असंख्य लोक पहात आहेत.