प्रतिनिधी /सांखळी
सांखळी मतदारसंघातिल सुर्ल येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या मंदिर परिसरातील कुंपण पावसामुळे मोडल्याने सुमारे दिड लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक दृष्टय़ा दिसून येत असल्याची माहिती देवस्थान अध्यक्ष रामा गावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या उपलब्ध माहितीनुसार देवस्थानचे पुजारी वझे यांच्या घराशेजारील मंदिराच्या परिसरातिल कुंपणाची चीऱयांचे कुंपण सोमरे वीस मीटर पावसामुळे मोडल्याने ते लवकर बांधण्यासाठी देवस्थान समिती सक्रिय झाल्याचे दिसून येते आज बुधवारी देवस्थान अध्यक्ष रामा गावकर, कुमनिदाद अध्यक्ष साईश गावकर, प्रशांत गावकर, गोकुळदास गावकर यांची यावेळी उपस्थिती होती. अध्यक्ष रामा गावकर, देवस्थान परिसरात जाऊन कुंपणाची पाहणी केली.