वनवासी लोक पाने, झाडांच्या साली इत्यादी नैसर्गिक वस्तूंचा उपयोग स्वत:चे शरीर झाकण्यासाठी करतात हे आपल्याला माहीत आहे. पण आता शहरी सुजिक्षित लोकही असे करु लागतील अशी स्थिती आहे. अर्थात शहरी लोकांनी वनवासींच्या या वेषभूषेचे अनुकरण केले तर ते आवश्यकता म्हणून नव्हे, तर फॅशन म्हणून असेल, हे निश्चित आहे. बऱ्याचदा अशा जुन्या-पुराण्या बाबी अध्याधुनिक फॅशन म्हणून रुढ होतात. वनवासींची केशभूषा शहरी नागरीकांनी फॅशन म्हणून स्वीकारलेली आहेच. आता यात वेषभूषेचीही भर पडेल अशी चिन्हे आहेत.