मुंबई दुसऱया तर बेंगळूर तिसऱया स्थानावर ः राजधानीत महिलाविरोधी गुन्हय़ांमध्ये 40 टक्क्यांची वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली देशात महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर आहे. नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार दिल्लीत 2020 मध्ये महिलांच्या विरोधात 9,782 गुन्हे नोंद करण्यात आले होते. 2021 मध्ये हा आकडा 40 टक्क्यांनी वाढून 13,892 वर पोहोचला आहे. दिल्लीनंत मुंबई 5,543 गुन्हय़ांसह दुसऱया तर बेंगळूर 3,127 गुन्हय़ांसाठी याप्रकरणी तिसऱया स्थानावर आहे.
महिलाविरोधी गुन्हे मुंबईत 12.76 टक्के तर बेंगळूरमध्ये 7.2 टक्के नोंद झाले आहेत. देशातील 19 मोठय़ा शहरांमध्ये महिलाविरोधी एकूण गुन्हय़ांपैकी केवळ दिल्लीतच 32 टक्के गुन्हे नोंद झाले आहेत.
दिल्लीत अन्य मोठय़ा शहरांच्या तुलनेत अपहरणाचे 3,948 गुन्हे नोंद झाले आहेत. पतींकडून अत्याचाराचे 4,674 तर अल्पवयीनांच्या लैंगिक शोषणाचे 833 गुन्हे नेंद करण्यात आले. दिल्लीत दरदिनी सरासरी दोन मुलींवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. तर हुंडाबळीच्या 136 घटना नोंद झाल्या आहेत.
आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये 2021 या साली दरदिनी दोन अल्पवयीन मुली बलात्काराला बळी पडल्या आहेत. मागील वर्षी 19 मोठय़ा शहरांमध्ये महिलांच्या विरोधातील एकूण नोंद गुन्हय़ांचे प्रमाण 43,414 इतके होते. यातील दिल्लीत 13,982 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तर हुंडय़ासाठी जीव घेण्यात आल्याच्या 136 घटनांची नोंद झाली आहे. 19 महानगरांमधील एकूण मृत्यूंच्या तुलनेत हे प्रमाण 36.26 टक्के इतके आहे. दिल्लीत मागील वर्षी महिलांच्या विनयभंगाशी संबंधित 2,022 गुन्हे नोंद झाले आहेत. 2021 मध्ये पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत 1,357 गुन्हे नोंद करण्यात आले.