लसी उपलब्ध नसल्याचे सूत्रांकडून स्पष्टीकरण
प्रतिनिधी /पणजी
चीन व इतर युरोपियन देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून त्याची दखल घेऊन काही लोक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र कोरोना लसीचा साठा नसल्याने लोकांना माघारी फ्ढिरावे लागत आहे. केंद्राकडे कोरोना लसींचा खूप साठा असून राज्यात एकही लस उपलब्ध नाही. केंद्राकडे लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली असून त्याला अद्याप प्रत्युत्तर मिळाले नाही. परिणामी राज्यात लसी येणार की नाही ते कळायला मार्ग नसल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले.
युरोपियन देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे काहीजणांकडून कोरोना लसीची विचारणा केली जात आहे. मात्र राज्यात लसी उपलब्ध नसल्यामुळे लसी घेण्यासाठी येणाऱया लोकांना लस घेतल्यावीना माघारी फ्ढिरावे लागत आहे.
दरम्यान प्रतिकार शक्ती वाढवणारा बुस्टर डोस राज्यात उपलब्ध असून तो पात्रताधारकांना देण्यात येत आहे. शनिवारी 37 जणांना बुस्टर डोस देण्यात आला. बुस्टर डोसलाही थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकांकडून प्रतिसाद नसल्याने परत पाठविला लसींचा साठा
गोव्यात यापूर्वी कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरेसा पुरवठा करण्यात आला होता. तथापी ती लस घेण्यासाठी लोक पुढे येत नसल्यामुळे शिल्लक साठा परत केंद्राकडे पाठवण्यात आला. आता राज्याच्या आरोग्य खात्याकडे एकही लस शिल्लक नाही. त्यामुळे ती देता येत नाही. लसींची पुन्हा मागणी होउढ लागल्याने राज्य सरकारने केंद्राकडे लसी पाठविण्याची विनंती केली आहे. परंतु त्यास अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याचे खात्याच्या सूत्रांनी सांगितले.