वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
चला पंढरीसी जाऊ।
रखुमाईदेवी वर पाहू।।
सुखा लागे करीसी तळमळ।
तरी तू पंढरीशी जाये एकवेळ।।
असा पांडुरंगाचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात कंग्राळी खुर्द येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरपासून कंग्राळी खुर्द ते श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडीचे बुधवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
सदर पायी दिंडी वारीचे हे अकरावे वर्ष असून गेली दहा वर्षे सदर वारीमध्ये कोणताही खंड न पडता आजतागायत ही वारी अखंडपणे प्रत्येक वषी उत्साहात सुरू आहे. कोरोना महामारीनंतर यावषी विठुरायाच्या दर्शनासाठी पुन्हा जोमाने सुरुवात केल्याचे दिंडी संस्थापक निंगोजी पाटील, अध्यक्ष हभप डिकाप्पा पावशे, सेपेटरी हणमंत पाटील, दिंडी चालक हभप आनंद मुतगेकर व इतरांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
यावेळी ऍड. सुधीर चव्हाण व पत्रकार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तीपूजन, आनंद सोनुलकर यांच्या हस्ते ज्ञानेश्वर महाराज मूर्तीपूजन, शटुप्पा पाटील यांच्या हस्ते तुकाराम महाराज मूर्तीपूजन, प्रशांत कटांबळे यांच्या हस्ते वीणा पूजन, परशराम निलजकर, बाळाराम पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन, बी. डी. मोहनगेकर, सिद्धार्थ पाटील, बाळू राजगोळकर, प्रकाश निलजकर, वसंत पाटील, सुधीर पाटील आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन रण्यात आले.
ग्रा. पं. उपाध्यक्षा ज्योती पाटील यांच्या हस्ते तुळस पूजन, प्रगतशील शेतकरी रामभाऊ पाटील यांच्या हस्ते अश्वपूजन, सौंदर्य पेंट्सचे संचालक आर. आय. पाटील यांच्या हस्ते विविध वाहनांचे पूजन तर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे साहाय्यक महांतेश वज्रभट्टी, महिला काँग्रेस ग्रामीण उपाध्यक्षा अंजली पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्षा ज्योती पाटीलसह सदस्यांच्या हस्ते पायी दिंडीचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन टी. डी. पाटील यांनी तर आभार सुनील पाटील यांनी मानले.
विशेष सत्कार
या कार्यक्रमाचे औचित्य साधून गेली अकरा वर्षे पायी दिंडी यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल दिंडीचे संस्थापक निंगोजी पाटील यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. दुपारी जाफरवाडीजवळील समर्थ मंगल कार्यालयामध्ये कंग्राळी खुर्द ग्रा. पं. सदस्यांच्यावतीने दिंडीतील सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.