रंजना कोळी यांची अनोखी भक्ती
वार्ताहर /किणये
आषाढी एकादशीनिमित्त सध्या तालुक्मयातील पायी दिंडय़ा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. पायी दिंडीत ज्यांना सहभागी होता येत नाही असे विठ्ठलाचे भक्त संतांचीये पायी हा माझा विश्वास ! सर्व भावे दास झालो त्यांचा !! या भावनेने पायी दिंडीतील वारकऱयांची सेवा करतात. अशीच एक अनोखी भक्ती अंकलीजवळ रंजना कोळी यांच्याकडून दिसून आली.
अंकली रस्त्याच्या बाजूला रंजना यांचे छोटे दुकान आहे. मंगळवारी पावसामुळे त्यांचे दुकान कोसळले. या मार्गावरून बुधवारी सकाळी निलजी गावातील वारकऱयांची पायी Eिदंडी जात होती. दुकान कोसळले म्हणून त्या हतबल झाल्या नाहीत. आपल्या दुकानासमोर पायी दिंडीचे त्यांनी मनोभावे स्वागत करून दिंडीतील सर्व वारकऱयांना केळय़ांचे वाटप केले. संतांच्या चरणी त्या नतमस्तक झाल्या. दुकान कोसळल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्नसुद्धा निर्माण झाला. तरीही त्यांची या दिंडीतील संतांवर, विठ्ठलावर असलेली भक्ती पाहून दिंडीतील वारकरी स्तब्ध झाले.
रंजना कोळी या सिद्धापूरवाडी येथे राहतात. अंकली रस्त्याच्या बाजूला दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. आयुष्यात संकटे आल्यानंतर खचून न जाता त्यांना सामोरे गेले पाहिजे, हेच त्यांच्या या जिद्दी आणि सत्कार्यामुळे दिसून आले. विठ्ठलावर आपली अपार श्रद्धा आहे, असेही त्यांनी बोलून दाखविले.