विश्वनाथ मोरे,कसबा बीड
करवीर तालुक्यातील कोगे, कसबा बीड, सावरवाडी व शिरोली दुमाला भागातील विठ्ठल पंथी वारकरी संप्रदायाचा पायी दिंडी सोहळ्यास आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. आषाढी वारीसाठी प्रतिवर्षी पायी दिंडीचे आयोजन प्रत्येक गावातील वारकरी संप्रदायाकडून होत असते. आज कोगे, कसबा बीड, सावरवाडी, गणेशवाडी, व शिरोली दुमाला या भागातील वारकरी संप्रदायाच्या पायी दिंडी सोहळ्यास विठ्ठल मंदीरात हरीपाठ, आरती करून भजन सेवा करत दिंडी काढली. गावतील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत गावाच्या वेशीपर्यत गावकर्यांनी सहभाग नोंदविला. ही पायी दिंडी कोल्हापूर मार्गे देहू,व आळंदी, पुणे, सासवड येथून वाखरी येथे सर्व पायी दिंड्याचे एकत्रीकरण होते. तेथे रिंगण सोहळा संपन्न होऊन पंढरपूरला जाऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन सर्व दिंड्या परत आपापल्या गावी परत येतात.
कोगे तालुका करवीर येथील पायी दिंडी सोहळ्यास जाणाऱ्या भाविकांना आरोग्य उपकेंद्र कोगे, डॉ. भरत घंगरगोळे यांचेकडून प्राथमिक औषधे व कीट देण्यात आले. यावेळी गावचे सरपंच आंबुबाई पाटील, कुंभी कासारी साखर कारखाना व्हा. चेअरमन विश्वास पाटील, कुंभी बॅकेचे संचालक रणजीत पाटील, उपसरपंच नामदेव सुतार, ग्रामसेवक डी. के. आंबेकर,सदस्य करण पाटील व सर्व सदस्य, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष टी. एन . पाटील ,संप्रदायाच वारकरी, महिला वर्ग उपस्थित होते. निघालेल्या पायी दिंडया यामुळे कसबा बीड भागातील सर्व गावात संपूर्ण भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
सांगरूळ मधून चालू वर्षी चार ग्रुप दिंडी सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत . गावातील ह भ प मंडळाच्या वतीने बाहेरी मंडप पासून गावातील विठ्ठल मंदिर पर्यंत टाळ मृदंग व पखवाजाच्या तालात दिंडी काढून तसेच आरती व पूजन करून दिंडी सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या . यानंतर हे सर्व वारकरी व भाविक दिंडी सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी आळंदीकडे रवाना झाले . हे सर्व भाविक तात्यासाहेब वासकर यांच्या रथा पुढील दिंडी क्रमांक एक व सात मध्ये सहभागी होणार आहेत .