प्रतिनिधी / बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा नंबर 7 येथे एंजल फाउंडेशनच्या वतीने चटईचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना बसण्याकरिता जमखाना चटईचा उपयोग व्हावा या उद्देशाने एंजल फाउंडेशनच्या वतीने शाळेला 150 चटई देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके, एच एम संजय पाटील, शशिकला जोशी, मिलन पवार यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षिका आणि कर्मचारी उपस्थित होते.
एंजल फाउंडेशनच्यावतीने शहरातील गरजूंना मदत करण्यात येते तसेच शैक्षणिक शाळांना भेट देऊन शाळेला आवश्यक असलेल्या गोष्टी पुरविण्यात येतात.