राजेश दाभोळकरांचा पुढाकार
कांदोळी : नेरूल येथे श्री परशुराम गोमंतक सेना व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेश दाभोलकर यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत नोटबुकचे वाटप श्री साखळेश्वर मंदिराच्या सभामंडपात करण्यात आले. या वर्षातील इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी व इयत्ता सहावी ते दहावीच्या अनुदानित व इतर वर्गाच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक राजेश दाभोलकर, श्री परशुराम गोमंतक सेनेचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर, उपाध्यक्ष सुनील शांतिनेशकर, सामाजिक कल्याण केंद्राचे अधिकारी रवी हरमलकर, अध्यक्ष श्रीकांत सातार्डेकर, सेक्रेटरी विनायक मयेकर, कोषाध्यक्ष स्वप्नील कळंगुटकर, माजी अध्यक्ष गुऊदास सातार्डेकर, रामकृष्ण मांद्रेकर व इतर देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. समाजसेवक राजेश दाभोलकर म्हणाले की, प्रत्येकाने समाजाशी असलेली आपले नाव कायम ठेवून आपल्या उत्पन्नातील काही भाग समाजातील उपेक्षित व गरजू विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी खर्च करावा तसेच गाव तेथे शाळा आणि शिकेल तो टिकेल या उद्देशाने गाव गावात हा उपक्रम करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे असे ज्येष्ठ समाज कार्यकर्ते श्री राजेश यांनी दाभोलकर यांनी सांगितले.
समाजसेवक राजेश दाभोलकर यांनी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून समाजातील एकत्र करण्यासाठी हाती घेतलेला हा उपक्रम अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळेच आज विद्यार्थ्यांसह पालक वर्गात आनंद व उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळाले याचे सर्व श्रेय राजेश दाभोलकर यांना जाते असे शैलेंद्र वेलिंगकर म्हणाले. शाळेत शिकत असलेल्या नेरूल गावच्या विद्यार्थ्यांना एकूण 300 हून जास्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक डझन प्रमाणे यावेळी वह्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे पदाधिकारी स्वप्नील कळंगुटकर, हरी चिमुलकर, देवा आगरवाडेकर, गोविंद गोवेकर, देवेंद्र नाईक, परेश बाणावलीकर, रितेश कळंगुटकर व इतर युवकांनी परिश्र्रम घेतले. सूत्रसंचालन विनायक मयेकर यांनी केले तर शेवटी अजित पेडणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.