प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त जायंट्स सखीच्या वतीने बालरोगतज्ञ आणि आयएमएच्या अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ यांचा शाल, स्मृतिचिन्ह, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षा चंद्रा चोपडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविकात सचिव सुलोचना शिनोळकर यांनी डॉ. अनगोळ यांच्या कार्याचा आढावा घेऊन डॉक्टरीपेशा सांभाळत करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती करून दिली.
यावेळी डॉ. राजश्री अनगोळ यांनी सखीच्या प्रत्येक सदस्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करून आपला आहार कसा असावा आणि तो कसा घ्यावा? याबद्दल माहिती दिली. यावेळी अध्यक्षा चंद्रा चोपडे आणि माजी अध्यक्षा निता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी अध्यक्षा निता पाटील, फेडरेशन संचालिका नम्रता महागावकर, उपाध्यक्षा विद्या सरनोबत यांच्यासह सर्व सदस्या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सुलक्षणा शिनोळकर यांनी केले.