वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी होणाऱ्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशनच्या (सॅफ) चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ जाहीर करण्यात आला. या ड्रॉनुसार भारताचा अ गटात समावेश आहे. सदर स्पर्धा 21 जून ते 4 जुलै दरम्यान भारतात होणार आहे.
या स्पर्धेच्या ड्रॉनुसार यजमान भारत, कुवेत, नेपाळ, पाक अ गटात तर लेबेनॉन, मालदीव, भुतान, बांगलादेश यांचा ब गटात समावेश आहे. आतापर्यंत भारतीय फुटबॉल संघाने ही स्पर्धा 8 वेळा जिंकली आहे. 2021 साली झालेल्या या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात नेपाळचा 3-0 असा पराभव केला होता.