क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युवजन क्रीडा खाते, महिला सबलीकरण व आबा स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय दसरा जलतरण स्पर्धेला मोठय़ा उत्साहात सुरूवात करण्यात आली.
मनपा रोटरी जलतरण तलावात या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पीएसआय श्रीमंत हळ्ळूर, युवजन क्रीडा अधिकारी जीनेश्वर पडणार, माजी क्रीडा अधिकारी विलास घाडी, नितीन जाधव, मोहन सप्रे व प्रशिक्षक विश्वास पवार आदी उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांना सर्व संघांची ओळख करून देण्यात आली. या स्पर्धेत बेळगाव जिल्हय़ातील 11 तालुक्मयातील सर्व जलतरणपटूंनी भाग घेतला होता. दोन दिवस चालणाऱया स्पर्धेत विविध जलतरण प्रकार घेण्यात आले.