मदर इंडिया चषक 12 वर्षाखाली क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : के. आर. शेट्टी, लायाज क्रिकेट अकादमी आयोजित 12 वर्षाखाली मदर इंडिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी लायाज अकादमीने युनियन जिमखानाचा, युनियन जिमखानाने एस. के. अकादमीचा, निना स्पोर्टसने उलकल क्रिकेट अकादमी निपाणीचा पराभव करून विजयी सलामी दिली. स्वयंम खोत, शाहरूख धारवाडकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. युनियन जिमखाना मैदानावरती आयोजित करण्यात आलेल्या मदर इंडिया 12 वषौखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी दिपीका कुट्रे, आरती पोरवाल, विनोद पाटील, डॉ. रामकृष्ण आर., शिवाजी पाटील, रोहित पोरवाल, स्वाती भाटी, अनिल गवी, तारिह सराफ, चंदन कुंदरनाड, प्रशांत लायंदर, मिलिंद चव्हाण आदी उपस्थित होती. मान्यवरांच्या हस्ते यष्टी पूजन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सामन्यात लायाज क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटका 8 गडीबाद 228 धावा केल्या. त्यात स्वयंम खोतने 2 षटकार 17 चौकारासह 113 धावा करून शतक झळकविले. त्याला विनय एनने 23 धावा करून सुरेख साथ दिली.
जिमखानातर्फे आयुष खाडेने 25 धावात 3, व मिथलीने 47 धावात 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखानाने 25 षटकात 4 गडीबाद 120 धावाच केल्या. त्यात राघव व्ही. ने. 1 षटकार, 4 चौकारासह 32 धावा केल्या. लायाज अकादमीतर्फे सुरजने 2 गडीबाद केले. दुसऱ्या सामन्यात युनियन जिमखानाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 4 गडीबाद 294 धावा केल्या. त्यात शाहरूख धारवाडकरने 3 षटकार, 13 चौकारासह 88, साईराज पोरवालने 2 षटकार व 9 चौकारासह 67 तर महम्मद अब्बासने 5 षटकार 5 चौकारासह 55 धावा केल्या. एसकेईतर्फे मनोज व राजेशने 2 गडीबाद केल्या. प्रत्युतरादाखल खेळताना एसकेईचा डाव 17.1 षटकात 72 धावात आटोपला. जिमखानातर्फे सलमानने 5 धावात 3, कौस्तुब पाटील व अंशने प्रत्येकी 2 गडीबाद केल्या. तिसऱ्या सामन्यात उलकलने प्रथम फलंदाजी करताना 16.5 षटकात 9 गडीबाद 73 धावा केल्या त्यात प्रविण्य भोहितेने 22, कुमार लमानीने 12 धावा केल्या. निनातर्फे जियान सलीमवालेने 2 तर अफनान व सुप्रित यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना निना संघाने 6.1 षटकात बिनबाद 76 धावा करून सामना 10 गड्यांनी जिंकला त्यात कृष्णा पिसेने 10 चौकारासह नाबाद 52 धावा केल्या.