वार्ताहर/ कुद्रेमनी
येथील बलभीम साहित्य संघाच्या अध्यक्षपदी मारुती शांताराम पाटील यांची तर उपाध्यक्षपदी अनंत लोहार व विशाल गुरव यांची निवड करण्यात आली. सचिवपदी एम. बी. गुरव, सहसचिवपदी दत्ता कांबळे यांच्यासह इतर कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या बैठकीत 2022-23 या वर्षाकरिता ही निवड झाली. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. माजी सदस्य नागेश राजगोळकर होते. प्रास्ताविक व स्वागत जी. जी. पाटील यांनी केले. इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे.
नागेश राजगोळकर, जी. जी. पाटील, शिवाजी शिंदे, बाळाराम धामणेकर, पी. एल. गुरव, महादेव गुरव, राजू राजगोळकर, रवी पाटील, जोतिबा बडसकर, संजय गुरव, बाबाजी गुरव, मोहन शिंदे, परशराम पाटील, अक्षय पावले, नागेश बोकमूरकर, महेश पाटील, सुशांत शिंदे, शैलेश गुरव, उमेश गुरव, लखन धामणेकर, माणिक गोवेकर, राम गुरव, रामलिंग पाटील, संतोष मांडेकर, मारुती गुरव, दीपक मराठे, जकाप्पा पाटील, राजू जांबोटकर, विशाल जांबोटकर, परशराम काकतकर, संजय पाटील यांची निवड झाली. यावेळी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. शैलेश गुरव यांनी आभार मानले.