Employees of SSPM Medical College and Life Time Hospital celebrated ‘Traditional Day’ with enthusiasm.
मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल व्यवस्थापन यांच्यामार्फत एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांसाठी ट्रॅडिशनल डे चा आयोजन करण्यात आलं होतं . या कार्यक्रमास सौ आसावरी राजोपाद्धे, एस एस पी एम मेडिकल कॉलेज डीन डॉक्टर अरुण कुवाळे ,मेडिकल सुप्रीटेंडेंट डॉक्टर आर. एस कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक केंद्रीय मंत्री नारायण राणे व नीलम राणे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रत्येक कर्मचाऱ्याला ऑर्गनायझेशन मध्ये काम करताना व काम करत असलेल्या ठिकाणचे वातावरण अतिशय महत्त्वपूर्ण असते .कामाच्या ठिकाणी सभोवतांचे वातावरण आनंदी असेल तर कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये अजून चांगले काम करण्याची आंतरिक आणि मानसिक क्षमता वाढण्यास मदत होते. तसेच एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल येथे नेहमीच कर्मचारी हिताचे निर्णय घेतले जातात. या अनुषंगाने आपल्या संस्थेतील प्रत्येक कर्मचारी आनंदी असेल तर आपण सिंधुदुर्गवासीयांना अजून चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा देऊ शकतो . आणि म्हणूनच एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना या ट्रॅडिशनल डे च्या निमित्ताने एक आनंदी वातावरण निर्माण करून देण्याचा प्रयत्न असून तो उत्साहात पार पडला आहे.
प्रतिनिधी डिगस