प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव मेनोपॉज सोसायटीची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. बेळगाव ओबीजी सोसायटीच्या सीएमई कार्यक्रमात इंडियन मेनोपॉज सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. शोभना मोहनदास यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे…
डॉ. वनिता मेटगुड संस्थापक अध्यक्षा, डॉ. सतीश धामणकर उपाध्यक्ष, डॉ. शोभना पट्टेद सचिव, सहसचिव डॉ. सोमय्या फिरदोस, खजिनदार डॉ. एम. सी. मेटगुड, सहखजिनदार डॉ. हेमा पाटील, कार्यकारिणी सदस्या डॉ. अनिता दलाल, डॉ. एम. बी. बेल्लद, डॉ. एस. के. भट्ट, डॉ. कमल पाटील, डॉ. रमा वाणी, डॉ. श्वेता घटनट्टी, डॉ. राजेश्वरी पाटील, डॉ. स्वाती वैद्य, सहसदस्य डॉ. राजेंद्र भांडणकर व डॉ. गीता देशपांडे.