राज्य सरचिटणीस संदिप दळवी यांचे आवाहन
गाव तेथे मनसे शाखा या अभियाना अंतर्गत मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस संदिप दळवी यांनी केले. कोंडुरा येथे आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. प्रत्येक गावात मनसेच्या झेंड्याखाली काम करण्यासाठी तयार असलेला तरुणवर्ग निर्माण करा, त्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाईल अशी ग्वाही देखील यावेळी व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांनी दिली.
यावेळी मेळाव्याला मनसेचे कामगार सेना राज्य सरचिटणीस गजानन राणे, महिला राज्य उपाध्यक्ष अनिषा माजगावकर, राज्य उपाध्यक्ष योगेश सावंत, योगेश साळुंखे, माजी जिल्हा अध्यक्ष धीरज परब, अमोल साळुंखे,माजी उपजिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर, महेश परब, राजू कासकर, सुधीर राऊळ, आशिष सुभेदार,अमित नाईक, सुनिल गवस, सनी बागकर, गुरुदास गवंडे, काशिराम गावडे, अतुल केसरकर, अजित पोळजी, आदेश सावंत, मिलिंद सावंत, मंदार नाईक,अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनेक तरुणांनी मनसेत जाहिर प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत संदिप दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
न्हावेली / वार्ताहर