बोगोटा
ः कोलंबिया या दक्षिण अमेरिकन देशात बॉम्बस्फोट झाला असून यात 8 पोलीस अधिकाऱयांचा मृत्यू झाला आहे. देशाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मागील 60 वर्षांमध्ये सुरक्षा दलांवर इतका घातक हल्ला झाला नव्हता असे म्हटले आहे. पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य करत हा स्फोट घडवून आणला गेला होता. या स्फोटामागे कुठल्या संघटनेचा किंवा गटाचा हात आहे हे अद्याप समोर आलेले नाही.