वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी होणाऱया आयएसएसएफ विश्व कनि÷ांच्या नेमबाजी स्पर्धेसाठी भारताच्या कनि÷ नेमबाजांच्या संघामध्ये सरबज्योत सिंगच्या जागी वरुण तोमरचा समावेश करण्यात आला. आता या स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तुल नेमबाजीत वरुण तोमर भारताचे प्रतिनिधित्व करेल.
शुक्रवारी अखिल भारतीय नेमबाज फेडरेशनने भारतीय नेमबाज संघाची घोषणा केली होती. भारतीय कनि÷ नेमबाज संघामध्ये पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तुल नेमबाज प्रकारासाठी सरबज्योत सिंग, सम्राट राणा आणि सागर दांगी यांचा समावेश करण्यात आला होता. पण, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सरबज्योत सिंग 22 व्या वर्षात पदार्पण करत असल्याने त्याला संघातून वगळण्यात आले, अशी माहिती अखिल भारतीय रायफल संघटनेच्या प्रवक्त्याने दिली. 31 डिसेंबरपर्यंत 21 वर्षाखालील नेमबाजांना केवळ या स्पर्धेत संधी दिली जाणार आहे. या आगामी स्पर्धेत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता नेमबाज विजयकुमार सहभागी होत आहे. सदर स्पर्धा इजिप्तमधील कैरो येथे 12 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होणार असून या स्पर्धेसाठी अ. भा. रायफल संघटनेने 48 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे.