पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल नसल्याची माहिती
नवी दिल्ली
महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मे रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. बुधवारी मात्र दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर विकले जात होते. त्याचवेळी, मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. बुधवारी कच्च्या तेलाच्या (ब्रेंट क्रूड) किमतीत लक्षणीय घट झाली आहे. या घसरणीसह ते 73 डॉलर प्रति बॅरलवर आले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरात अधिक काळ बदल नाही
21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत शेवटचा बदल करण्यात आला होता. त्यानंतर अबकारी शुल्क पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करण्यात आले. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 9.5 आणि 7 रुपयांनी कमी झाले. जुलै 2022 मध्ये, महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 5 रुपये आणि 3 रुपये प्रति लिटर कपात केली.
16 राज्यांमध्ये पेट्रोल 100 च्या वर
देशातील 16 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांवर आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, तेलंगणा, पंजाब, झारखंड, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि राजस्थानमधील सर्व जिह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. त्याचवेळी ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये डिझेलही 100 रुपयांच्या वर आहे.
राजस्थानमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल
भारतातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकले जात आहे. येथे एक लिटर पेट्रोलचा दर 113.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 98.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. त्याचवेळी, महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 109.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.66 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. तर पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल विकले जात आहे. येथे पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
सिलिंडरची किंमत आज होणार जाहीर
सरकारी तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. याखेपेला वाढ होते की कपात हे पाहावे लागेल. यापूर्वी 1 मे रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडर 171.50 रुपयांनी स्वस्त झाला होता. तथापि, घरगुती गॅस सिलेंडर (14.2 किलो) च्या किमतीत कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. याशिवाय भविष्यात सीएनजी-पीएनजीच्या किमतीही वाढू शकतात.