दोन बसची टक्कर ः 78 जण जखमी ः मृतांचा आकडा वाढण्याची भीती
@वृत्तसंस्था / डकार
सेनेगल या आफ्रिकन देशात रविवारी भीषण रस्ते दुर्घटना झाली असून यात किमान 40 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर 78 प्रवासी जखमी झाले आहेत. मध्य सेनेगलमध्ये दोन बसेस परस्परांना धडकल्या आहेत. कॅफरीन क्षेत्रातील गनीबी गावात पहाटे साडेतीन वाजता ही दुर्घटना घडली असल्याचे राष्ट्रपती मॅकी सॉल यांनी सांगितले आहे. राष्ट्रपतींनी या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा शोक घोषित केला आहे. एका बसचा टायर पंक्चर झाल्याने ती दुसऱया बसला जाऊन धडकली. दुर्घटनेत 78 जण जखमी झाले असून यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. खराब रस्ते, दर्जाहीन वाहने तसेच चालकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने पश्चिम आफ्रिकन देशात मोठय़ा प्रमाणात दुर्घटना होत आहेत.