चेन्नई
खाजगी क्षेत्रातील फेडरल बँकेने आपल्या विस्ताराच्या कार्यक्रमाला सुरूवात केली असून याचाच एक भाग म्हणून बँकेने अलीकडेच देशभरात 15 नवीन शाखा सुरु केल्या आहेत, अशी माहिती बँकेने दिली आहे. सदरच्या शाखांपैकी जवळपास 15 नव्या शाखांमधील सात तामिळनाडूमध्ये आहेत. अशा प्रकारे राज्यात बँकेच्या एकूण 171 शाखा स्थापन केल्या आहेत. फेडरल बँकेचे शाखा बँकिंग प्रमुख नंदकुमार व्ही म्हणाले, की ‘आम्ही या वर्षी जूनमध्ये एका दिवसात 10 शाखा उघडल्या. आता आमच्या विविध ठिकाणी 15 शाखा आहेत. बँक तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात यांसारख्या राज्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे.