उपस्थित भाविकांच्या तोंडावर उमलले समाधानी हास्य. मामलेदारांनी मंदिर खोलण्याचा आदेश जारी करीत खोलले मंदिर.
डिचोली : गेले पंधरा दिवस बंद असलेले केळबाईवाडा मये येथील देवी केळबाईचे बंद असलेले मंदिर काल मंगळ. दि. 11 एप्रिल रोजी दुपारी मामलेदारांनी एक आदेश जारी करत ब्राह्मणाकरवी खुले केले. देवस्थान समितीने मंदिर खुले करण्यासंबंधी दिलेल्या पत्राच्या आधारे मामलेदार राजाराम परब यांनी सदर आदेश जारी केला. दु. 3 वा. च्या सुमारास मामलेदार ब्राह्मणांना व मंदिराची चावी घेऊन मंदिरात दाखल झाले व त्यांनी मंदिराचे दार उघडले. मंदिराचे दार उघडताच सभामंडपात उपस्थित भाविकांनी केळबाई माता की जय असा जयघोष केला. गेल्या 26 मार्च रोजीपासून मंदिर परब समाज व नाईक समाजातील वादामुळे समितीने बंद केले होते. त्यामुळे या मंदिरात येण्राया भाविकांना देवीचे दर्श घेता आले नाही. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे देवस्थान समितीने काल मंगळ. दि. 11 एप्रिल रोजी मामलेदारांना मंदिर उघडण्यासंबंधी निवेदन सादर केले. त्या निवेदनावर मामलेदारांनी आपला आदेश जारी केला.
या मंदिराचे पुरोहित शिवराम वझे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याने देवस्थान समितीकडून मंदिराच्या चाव्या घ्याव्यात आणि मंदिर उघडावे. देवीची नित्यपुजा करावी. केवळ पुज्रायानेच पुजा करावी, इतर कोणत्याही व्यक्तीकडून मंदिरात कोणत्याही विधी होऊ नयेत. मंदिर संध्याकाळपर्यंत उघडे ठेवल्यानंतर बंद करून चाव्या समितीकडे द्याव्यात. या मंदिरात भाविक भक्तांकडून दानाच्या स्वरूपात येण्राया दागिने व पैसे केवळ पुज्रायानेच स्विकारावे व संबंधितांना रितसर पावती द्यावी. दररोजच्या दान वस्तूंचा हिशोब पुज्रायाने राखावा. सर्व भाविकांनी मंदिराचे पावित्र्य राखावे. तसेच डिचोली पोलीस निरीक्षकांनी कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे पाळावी व कोणीही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करत असल्यास कठोर कारवाई करावी. अशा सदर आदेशात अटी घालण्यात आलेल्या आहेत. हा आदेश मंदिरात चिकटविण्यात आलेला आहे. दुपारी मंदिराचे दार उघडण्यासाठी मामलेदार पुज्रायांना घेऊन करता ले त्यावेळी मंदिरात केळबाईवाडा येथील मोठ्या संख्येने भाविक व महिला उपस्थित होती. त्यांनी केळबाई माता की जयचा जयघोष केला. पंधरा दिवसांनंतर बंद देवीचे मंदिर पुन्हा खुले झाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.
रेड्याची जत्रा संपन्न होण्याची शक्यता कमी
पूर्वपरंपरेनुसार मयेत होण्राया रेड्याच्या जत्रेची वक्यता कमीच आहे. कारण देवीची पेठ व माले केळबाई मंदिरातून बाहेरच पडले नव्हते. ते महामाया मंदिराकडे ठेवले जाते व तेथून या जत्रोत्सवाच्या दिवशी पहाटे पुन्हा सजवून केळबाईवाडा येथे नेले जातात. यावेळी त्यांच्यासमवेत देवीचा कळस, मयेतील रवळनाथ भुतनाथची तरंगदेवता व माशेल येथून जलमार्गे येणारी देवकीकृष्ण व पिसोरवळनाथ देवतांची तरंगे असतात. परंतु महामाया मंदिराकडे पेठ व माले नसल्याने हि जत्रा होण्याची शक्यता कमीच आहे. माशेल येथून जलमार्गे देवकीकृष्ण व पिसोरवळनाथ देवतांची तरंगे येणार. पण ते आपल्या सर्व विधी परंपरेप्रमाणे करून जाणार. केळबाईवाडा येथे देवी केळबाई मंदिराजवळ माले नाचणार नाही.