प्रतिनिधी /बेळगाव
मंगळवारी रात्री राणी कित्तूर चन्नम्मा यांचा पुतळा असलेल्या चबुतऱयाला कॅन्टरची धडक बसली होती. या प्रकरणी कॅन्टर चालकाविरुद्ध बुधवारी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून या अपघातात क्लिनर जखमी झाला आहे.
विठ्ठल व्यंकट पाटील (वय 45, रा. इदलहोंड, ता. खानापूर) असे जखमी क्लिनरचे नाव आहे. कॅन्टर चालक स्वप्निल नागेश पाटील (रा. इदलहोंड) याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक पुढील तपास करीत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 11.10 वाजता हा अपघात घडला आहे. केए 23 ए 3581 क्रमांकाच्या कॅन्टरमधून भाजी वाहतूक करण्यात येत होती. गोव्याला जाताना कॅन्टरची कित्तूर चन्नम्मा यांचा पुतळा असलेल्या चबुतऱयाला धडक बसली. पुतळय़ाच्या उत्तरेकडील कंपाऊंडचे नुकसान झाले आहे.